मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (11:37 IST)

गुढीपाडवा : या दिवशी हे 6 कामे नक्की करावे, सकाळी संकल्प मंत्राने दिवसाची सुरुवात करावी

गुढीपाडव्यला मुख्य रुपाने हे 6 शुभ आणि मंगळदायी कार्य केले जातात....
• नव वर्ष फल श्रवण (नवीन वर्षाचं भविष्यफल जाणून घेणे)
• तेल अभ्यंग (तेल लावून स्नान करणे)
• निम्ब-पत्र प्राशन (कडुलिंबाची पाने सेवन करणे)
• ध्वजारोपण
• चैत्र नवरात्री आरंभ
• घटस्थापना
 
संकल्प करताना नव वर्ष नामग्रहण (नवीन वर्षाचं नाव ठेवण्याची प्रथा) ला चैत्र अधिक मासमध्ये शुक्ल पक्षाच्या प्रतिपदाला साजरा केलं जातं. या संवत्सराचे नाव आनंद असे आहे आणि वर्ष 2078 आहे. सोबतच हे श्री शालीवाहन शकसंवत 1943 देखील आहे आणि या शक संवताचे नाव प्लव असे आहे.
 
नव संवत्सराचा राजा (वर्षेश)
नए वर्षाच्या प्रथम दिनाच्या स्वामीला त्या वर्षाचा स्वामी देखील मानतात. 2021 मध्ये हिन्दू नव वर्ष मंगळवारपासून आरंभ होत आहे म्हणून नवीन सम्वताचा स्वामी मंगळ आहे.
 
गुढी पाडवा पूजन-मंत्र
 
प्रातः व्रत संकल्प
ॐ विष्णुः विष्णुः विष्णुः, अद्य ब्रह्मणो वयसः परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बूद्वीपे भारतवर्षे अमुकनामसंवत्सरे चैत्रशुक्ल प्रतिपदि अमुकवासरे अमुकगोत्रः अमुकनामाऽहं प्रारभमाणस्य नववर्षस्यास्य प्रथमदिवसे विश्वसृजः श्रीब्रह्मणः प्रसादाय व्रतं करिष्ये।