रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2019 (17:09 IST)

गंगा जमुना येथील १५० वर्ष जुनी वैश्यावस्ती हटवा

राज्यभरात गुढीपाडव्याच्या उत्साह जोरदार असून, शोभायात्रांमधून अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. उपराजधानी असलेल्या नागपुरातही एका सामाजिक वेगळ्या उद्देशासाठी 51 फुटांची गुढी उभारली आहे. गंगा जमुना परिसरातील वेश्यावस्ती हटवण्याची मागणी करण्यासाठी, परिसरातील लोकांनी आज 51 फुटांची गुढी उभारली आहे. 
 
पूर्व नागपुरात गंगा जमुना ही 150 वर्षे जुनी वेश्यावस्ती असून, वस्तीच्या परिसरात सर्वसामान्य लोकंही राहतात. मात्र आता या वेश्यावस्तीमुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत असून, त्यामुळे ही वस्ती हटविण्याच्या मागणी स्थानिकांनी अनेकवेळा केलीय. आता सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज याच परिसरात 51 फुटांची गुढी उभारण्यात आली आहे.