सुप्रिया सुळे यांचे मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर
पवार कुटुंबीयावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नसत नसल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे प्रचार सभा घेऊन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
सध्या सर्वसामान्य जनतेचे मुळ मुद्दे बाजुला ठेवण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार आहे. असा सवाल करत देशाचे पंतप्रधान एखाद्या कुटुंबावर हल्ला करतात, म्हणजे त्यांच्याकडे ठोस मुद्दे नाहीत, अशी टीका सुळे यांनी मोदींवर केली आहे.
तसेच सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे मी मोठ्या अपेक्षाने पाहत होते. पंतप्रधान पक्षाचे नसतात, देशाचे असतात. त्यामुळे देशातील विकासाबद्दल, बेरोजगारी आणि महागाईवर मोदी स्पष्टीकरण देतील, असे मला वाटत होते. पण पवारांवर टीका केल्या शिवाय प्रसिद्धी मिळत नसल्याचे सांगत पवार घराण्यावर झालेला हा हल्ला दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.