शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

रिक्षा चालवून उर्मिलाने केला प्रचार

मुंबई उत्तरमधून उर्मिला मातोंडकर लढणार आहे. उर्मिलाने गोरई परिसरात जावून रिक्षा चालकांची भेट घेतली. आणि मते देण्‍याची विनंती केली.मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उर्मिला गोरई परिसरात रिक्षा चालकांसोबत प्रचार करताना दिसली. यावेळी उर्मिलाने गोरई (मुंबई) मध्‍ये काँग्रेस कार्यालयात जाण्‍यापूर्वी रिक्षा चालकांची भेट घेतली. आणि मते देण्‍याचे आवाहन केले आहे. उर्मिलाचा रिक्षामध्‍ये बसलेला फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. 
 
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तगडे उमेदवार आव्हान परतवून लावण्यासाठी काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. उत्तर मुंबईतून पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. मात्र छेडा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला. अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली.