शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

चार टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सजग नागरिकांनो, आधी मतदान करून मगच लुटा सुट्टीचा आनंद, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदारांनो, ऐका हो ऐका. पाच वर्षांनी मिळणार संधी. संधी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीउत्सवात सहभागी होण्याची आहे.

संधी तुमचा राजा ठरवण्याची आहे. ही संधी वाया घालवू नका. मतदारांनी मतदान करावं म्हणून राज्यात ११ एप्रिल १८ एप्रिल, २३ एप्रिल आणि २९ एप्रिलला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अर्थात चारही दिवस सरसकट सुट्टी नाही. तर ज्या दिवशी मतदान  आहे, त्या भागात फक्त त्या दिवशीच सुट्टी मिळणार आहे.

पण महत्त्वाचं म्हणजे १८ एप्रिल या मतदानाच्या तारखेआधी १७ एप्रिलला महावीर जयंती आहे. तर १९ एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे आणि त्यानंतर शनिवार रविवार आहे. तर २९ एप्रिलला सोमवार आहे. त्याच्या आधी शनिवार-रविवार आहे. १८ आणि २९ एप्रिल या दोन मतदानाच्या तारखा सुट्ट्यांना लागून आहेत.