शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 मार्च 2019 (16:20 IST)

दहा टक्के मतदान केंद्रावर होणार ‘वेब कास्टींग’, यवतमाळ जिल्हाधिका-यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

यवतमाळ येथे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अधिक पारदर्शिपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर ‘वेब कास्टींग’ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील दहा टक्के मतदान केंद्रावर ‘वेब कास्टींग’ करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी (14- यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ)अजय गुल्हाने यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
 
वेब कास्टींग करण्यात येणारे मतदान केंद्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्वरीत ठरवावे, अशा सुचना देऊन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, शक्यतोवर संवेदनशील किंवा यापूर्वी भुतकाळात अप्रिय घटना घडलेले मतदान केंद्र वेब कास्टींगकरीता निवडा. त्यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य घ्या. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा प्रोटोकॉल सांभाळणे गरजेचे आहे. या मशीन सुरक्षित जागी ठेवा. तेथे सुरक्षारक्षक ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर रॅम्प, विद्युत व्यवस्था, शेड, पिण्याचे पाणी, मेडीकल किट, व्हीलचेअर आदी सुविधांबाबत पाठपुरावा करून त्या पूर्ण करून घ्याव्या. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना विविध परवानगीकरीता एक खिडकी योजना अंमलात आणावी. त्यांना त्वरीत परवानगी देणे महत्वाचे आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हाधिका-यांनी कर्मचा-यांच्या प्रशिक्षणाची स्थिती, प्रशिक्षणाची जागा व वेळ, स्ट्राँग रुम, एसएसटीला नियमित भेटी, खर्चाचे नियंत्रण आदी बाबींचा आढावा घेतला. बैठकीला संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च नियंत्रक टीमचे अधिकारी आदी उपस्थित होते. 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 2019 रोजी होणार असून या मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 2181 आहे.