सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 राजकीय पक्ष
Written By

भाजप: राम, राष्ट्रवाद आणि हिंदुत्वामुळे सत्ता

तसे तर भारतीय जनता पार्टी (बीजेपी) ची स्थापना 1980 मध्ये झाली, पण पाया श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये बांधलेले भारतीय जनसंघच आहे. त्याचे संस्थापक अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी राहिले, जेव्हा की मुस्लिम चेहऱ्याचा रूपात सिकंदर बख्त हे महासचिव झाले.
 
1984 च्या निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या, पण सध्या सर्वाधिक राज्यांमध्ये भाजपची स्वतःची किंवा भाजप समर्थन सरकार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनंतर भाजप देशात
एकच असा पक्ष बनला ज्याने निवडणूक जरी गठबंधन भागीदारांसह लढले, पण 282 जागा मिळवून स्वत:चे बहुमत मिळविले.
 
अयोध्यामध्ये राम मंदिर आणि हिंदुत्व भाजपकडे असे मुद्दे राहिले ज्यामुळे पक्ष 2 ते 282 जागांपर्यंत पोहोचले. भाजप मजबूत करण्यात वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अडवाणी यांच्या रथ यात्रेमुळे भाजपच्या जनाधाराला आणखी व्यापक केले. 1996 मध्ये अटल बिहारी वाजपेयी भाजपचे प्रथम पंतप्रधान बनले, परंतु बहुमतच्या अभावामुळे त्यांची सरकार 13 दिवसांतच पडली. 1998 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा वाजपेयी पंतप्रधान बनले, पण जयललिता यांच्यामुळे त्यांची सरकार पुन्हा पडली.
 
1999 मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधान बनले आणि त्यांनी गठबंधन सरकार चालविली. तथापि 2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते सत्तेत परत येऊ शकले नाहीत. 2014 लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पूर्ण बहुमत सरकार बनवली. 2018 मध्ये भाजपच्या हातातून मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढासारख्या प्रमुख हिंदी भाष्यी राज्य निघून गेले.