पुण्याच्या जागेबाबत अद्याप चर्चा नाही – जयंत पाटील
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते एकत्रित काम करतील. त्यासाठीच रावेरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. पुण्याच्या जागेबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत आम्ही फडणवीस सरकारमधील १६ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे काम केले. दिलीप कांबळे यांचे २ कोटीचे लाचप्रकरणही मुख्यमंत्री दाबून टाकतील, याची मला खात्रीच आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांना वाचवून चूक करत आहेत. यामुळे राज्यात चुकीचा संदेश जातो आहे, असेही पाटील म्हणाले.