मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (17:30 IST)

मुंबईत निमविषारी साप सापडला

मुंबईच्या चर्नीरोडमध्ये ‘ग्लॉसी बॅलिड रेसर’ नावाचा निमविषारी साप आढळला आहे. सर्वात वेगाने धावणारा हा सर्प असल्यामुळे याला रेसर असं म्हटलं जातं. आतापर्यंत हा सर्प मुंबईत कधीच आढळला नव्हता. हा साप उष्ण,कोरडा आणि वाळवंटी परिसरात अढळतो. हा सर्प निमविषारी आहे. सर्पाची लांबी अडीच फुट आहे. हा साप मुंबईत आढळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. 
 
सर्पाला जखम झाल्यामुळे तो वेगाने धावू शकत नव्हता. नागरिकांनी पकडून सुरक्षीत ठेवण्यात आले होते. सर्प संस्थेला सर्पाची माहिती देण्यात आली आहे. सर्पावर पुढील उपचार सुरू आहेत. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमालय येथे हा सर्प आढळून येतो. दिल्लीमध्ये २०१२ साली हा सर्प आढळून आला होता. पाल,सरडा आणि बेडूक असं त्याच खाद्य आहे. 

फोटो: सांकेतिक