शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नृत्य केलं म्हणून पत्नीला केली मारहाण, पत्नीला गंभीर इजा

मुंबईतल्या कल्याणमध्ये मुलाच्या शाळेच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन नृत्य केलं म्हणून एका माणसाने त्याच्या पत्नीला मारहाण केली आहे. या घटनेत पत्नीच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर इजा झाली आहे. 
 
या घटनेत सुनील काळोखे (30) असं या माणसाचं नाव आहे. सुनीलची पत्नी अल्पा (25) हिने त्यांच्या मुलाच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सुनीलला ते पसंत नव्हतं. त्यावरून त्यांचा वादही झाला होता. मात्र, अल्पाने सहभागातून माघार घेतली नव्हती. 19 जानेवारी रोजी कार्यक्रम आटपल्यानंतर अल्पा घरी आली तेव्हा पुन्हा त्यांच्यात याच गोष्टीवरून वाद झाला. संतापाच्या भरात सुनीलने क्रिकेटच्या बॅटने अल्पाला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत अल्पा जखमी झाली. या मारहाणीची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सुनीलविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.