बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2019 (13:06 IST)

तर भविष्यात माणसाला लांब बोटं, लांब नाक आणि मोठं डोकं असेल- हायकोर्ट

पर्यावरणाचा सतत ऱ्हास होऊ लागल्यानं भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. कदाचित त्यांना शारीरिक अपंगत्वही येईल अशी भीती व्यक्त करताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांनी चक्क तसे रेखाचित्रच काढून दाखवले.
 
मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्यायाधीश नितीन जमादार यांच्या खंडपीठापुढे सध्या कोस्टल रोडसंदर्भातील जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी आहे.
 
समुद्र किनाऱ्यांवर भराव टाकून हा रस्ता करताना पर्यावरण विषयक कोणतीही परवानगी सरकारने घेतलेली नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
 
पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना भविष्यात मानवी शरीर कसं असू शकतं, हे सांगताना न्यायाधीशांनी कागदावर रेखाचित्र काढून दाखवलं. सतत संगणकापुढे बसल्यानं बोटे लांब होतील, प्रदुषित वायूमुळे लांब नाक होईल आणि हालचाल कमी झाल्यामुळे शरीर आखूड होऊन डोकं मोठं होईल, असं विश्लेषण त्यांनी केलं.