रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (10:12 IST)

लाच म्हणून महिलेकडून शरिरसुखाची मागणी आरोपी लिपिकास अटक

धक्कदायक प्रकार घडला असून हा असा प्रकार प्रथमच उघड झाला असून त्यावर कारवाई झाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने राज्यभरात पैसे स्वरूपात लाच घेताना अनेक सापळे रचले व रंगेहाथ आरोपींना अटक केली. प्रथमच एसीबीने शरीरसुखासाठी मागणी करणाऱ्याला सापळा रचून अटक केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) कर प्रभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (४८) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) पकडले आहे. फिर्यादी असलेल्या ३० वर्षीय महिलेने राहत्या घराचे प्रलंबित मालमत्ता कर भरण्यास जप्ती वॉरंट बजावणी पूर्व अखेरची सूचना काढली, या नोटीस अनुषंगाने मालमत्ता कर भरण्यास मुदत वाढवून देण्यासाठी, मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्यासाठी लाचेच्या स्वरुपात लिपिक राजपूतने तक्रारदार महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. मात्र या घृणास्पद मागणीसाठी तक्रारदार महिलेने एसीबीच्या २६ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. या गंभीर तक्रारीची पूर्ण तपासणी करत सुभाष मैदान येथील गार्डनमध्ये तक्रारदार हिस भेटण्यासाठी लिपिकाने बोलावले होते, त्यावेळी सापळा रचून राजपूतला एसीबीने पकडले आहे. महिलांच्या बाजूने अनेक कायदे असून,  त्यांच्यावरील अत्याचार मात्र सुरूच आहेअसे दिसते आहे. मात्र महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी जुलै २०१७ पासून शरीरसुखाची मागणी हाही लाचेचाच प्रकार ठरणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील बदलांमुळे महिलांना संरक्षण मिळणार आहे. एसीबीच्या कायद्यात 'अनड्यू अॅडव्हांटेज ऑफ एनी थिंग' असा नवा शब्द समाविष्ट केल्याने हा लाचेचाच गुन्हा ठरणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सापळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याला १ ते ३ वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. यामुळे आता महिला अधिक सक्षम होणार असून या लिपिकास चांगलाच धडा तर मिळाला मात्र येथून पुढे कोणीही असे करणार नाही असेही कारवाईतून पुढे आले आहे.