रविवार, 16 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (21:12 IST)

मनसेने एजंट राजू शेट्टीला चोपले, वृद्धाची केली होती फसवणूक

Raju Shetty
मुंबई येथील विरार परिसरात घर देण्याच्या नावाखाली १७ लाखांची फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. या रिअल इस्टेट एजंटचे नाव राजू शेट्टी असे असून त्याने ६५ वर्षांच्या वृद्धाकडून २०१३ साली १७ लाख रुपये व्यवहारासाठी घेतले होते. हा सर्व संतापजनक प्रकार समजताच मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टीला गाठले आणि फेसबुक लाइव्ह करत त्याला चांगलाच चोप दिला आहे. मनसेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह करत, कर्करोगाने ग्रासलेल्या वृद्ध रुग्णाची व्यथा समोर आणली होती. विरार येथे राहणाऱ्या राजू शेट्टी इस्टेट एजंटने त्या वृद्धाला १७ लाख रुपयांची फसवणूक केली होती. २०१३ मध्ये राजू शेट्टीने वृद्धाला विरारमध्ये घर घेऊन देण्याचे आश्वासन देत, यासाठी त्याने वृद्ध रुग्णाकडून जवळपास १७ लाख रुपये घेतले होते. मात्र, पैसे घेतल्यावर त्याने घराचा ताबा दिलाच नाही. वृद्ध व्यक्तीने राजू शेट्टीकडे पैसे परत देण्याची विनंतीही केली. यासाठी पोलिसांकडेही धाव घेतली. मात्र, त्यांना मदत मिळाली नाही, असे त्या वृद्धाच्या कुटुंबीयांनी आपली व्यथा मांडली आहे. शेवटी वृद्ध रुग्णाने आणि त्याच्या मुलाने नितीन नांदगावकर यांच्याकडे संपर्क करत त्यांची व्यथा मांडली होती. यानंतर मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी राजू शेट्टीला गाठले आणि फेसबुक लाइव्ह करत त्याला चोपही दिला. पुढच्या दोन दिवसांत पैसे दिले नाही तर मनसे पुढे काय करणार हे त्याला दाखवू, असा इशाराही दिला आहे.