मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2019 (10:25 IST)

दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज घेतल्याची खोटी नोंद

राज्यातील दिव्यांग विकास महमंडळाकडून १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज घेतल्याची खोटी नोंद करण्यात आली असून सरकारने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे का? असा संतप्त प्रश्न आ. प्रकाश गजभिये यांनी विधान परिषदेत केला. दिव्यांग शेतकऱ्यांनी दिव्यांग विकास महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज केला व त्यासाठी पुरावे म्हणून मालमत्तेची कागदपत्रे देखील दिली. महामंडळातील अधिकाऱ्यांनी त्या दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज घेतल्याची खोटी नोंद केली. त्यामुळे या दिव्यांग शेतकऱ्यांना आता दुसरीकडेही कर्ज उपलब्ध होत नसल्याचे गजभिये म्हणाले. राज्यात शेतकरी दुष्काळी परिस्थिमुळे त्रस्त असताना या दिव्यांग शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या कर्जाची नोंद करून अधिकारी पैशांचा भष्ट्राचार करू पाहत आहे, असेही गजभिये म्हणाले.