मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (10:03 IST)

अमिताभ यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्याचे कर्ज फेडले

बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून जास्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडले आहे. स्वत: अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, ‘माझं आश्वासन पूर्ण केलं आहे. बिहारमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी होती, त्यांच्यातील २१०० जणांची निवड करण्यात आली आणि ओटीएसच्या (वन टाइम सेटलमेंट) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली आहे’. अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांपैकी काहीजणांना बोलावलं होतं. तिथे मुलगी श्वेता आणि अभिषेकच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्रं देण्यात आली. 
 
अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांची मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी त्यांनी उत्तर प्रदेशातील तीन हजाराहून जास्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं.