ऑस्ट्रेलियामध्ये 22 पुरूषांनी प्रेग्नेंसीनंतर दिला बाळांना जन्म
ऑस्ट्रेलियामध्ये वर्ष 2018- 29 मध्ये 22 पुरूषांनी गर्भधारण करुन बाळांना जन्म दिलाय. या बाबतीत अधिकृत आकडे जाहीर करण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार, डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्व्हिसने बर्थ रेटसंबंधी डेटा जाहीर केलाय. त्यानुसार जन्म देणाऱ्यांमध्ये 22 ट्रान्सजेंडर पुरूष होते. यासोबतच या पुरूषांचं नाव 228 त्या पुरूषांच्या यादीत नोंदवलं गेलं, ज्यांनी गेल्या एक दशकात बाळांना जन्म दिला होता आणि याची अधिकृत माहिती दिली होती.
याआधी 2009 पर्यंत याबाबतीत कोणताही अधिकृत माहिती किंवा आकडेवारी समोर आली नव्हती. मात्र, एक केस समोर आली होती. पण या केसला 'अननोन' म्हणून नोंदवण्यात आलं होतं.
लिंग बदलून पुरूष झाल्यावर सुद्धा बाळांना जन्म देण्याच्या केसेस समोर आल्यानंतर काही लोकांनी पौरूषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांचं म्हणणं होतं की, जर एखादा पुरूष बाळाला जन्म देतो तेव्हा मुळात तो पुरूष असूनच शकत नाही.
रिपोर्ट्सनुसार, हा विचार मेलबर्न यूनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकांनी नाकारला आहे. त्यांचं मत आहे की, पौरूषत्वाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. इतकेच काय तर पुरूषांचे विचारही याबाबतीत एकमेकांपासून वेगवेगळे असू शकतात.
ते म्हणाले की, हे शक्य आहे की, ज्यांनी सेक्स चेंज ऑपरेशन केलंय, ती व्यक्ती याबाबतीत विचार करत असेल, पण त्याची विचार करण्याची पद्धत रूढीवादी नसेल, जशी इतर लोकांची असते. त्यांना बाळांना जन्म देण्यात काहीच अडचण नसेल आणि ते याला पौरूषत्वावर प्रश्न असंही मानत नसतील. आता वेळ आली आहे की, लोकांनी जेंडरबाबत समाजाने आपले विचार बदलायला हवे.
तरी काही लोकं पुरुषांद्वारे बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया चुकीची असल्याचे मत मांडत आहे तर काही समर्थन करत आहे.