मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (09:59 IST)

आंतरराष्टीय पातळीवर बहुमान, भारताला जी -7 समिटचे निमंत्रण

जी -7 म्हणजेच सात देशांच्या गटाची समिट यावेळी फ्रान्समध्ये होत आहे. 24 ते 26 ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या या समिटसाठी  सदस्य नसलेल्या काही देशांनाही निमंत्रण देण्यात आलंय, ज्यात भारताचाही समावेश आहे. भारताशिवाय काही मुद्द्यांवर पुढे जाणं शक्य नसल्याचं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. या गटाच्या (G7 Paris) सात देशांशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, सेनेगल आणि रवांडा या देशाच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आलंय.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रेडो, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आणि इतर नेते या परिषदेत भेटतील. या परिषदेत असमानता हा प्रमुख मुद्दे असेल, असा अजेंडा इमॅन्युल मॅक्रॉन यांनी जाहीर केलाय. लैंगिक, आर्थिक आणि सामाजिक असमानता यावर बैठकीत चर्चा केली जाईल.