शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

त्याच्या अती प्रेमाला कंटाळून बायकोने मागितला घटस्फोट

एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाही किंवा एकमेकांकडे दुर्लक्ष होत आहे, काळजी घेत नाही, वाद होतोय अशा कारणामुळे नवरा-बायको वेगळं होण्याचा निर्णय घेतात. परंतू यूएईमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यात नवरा अती प्रेम करतो म्हणून कंटाळून बायको घटस्फोटाची मागणी करत आहे. 
 
दोघांच्या लग्नाला केवळ एकच वर्ष झाले असून महिलेने कोर्टात घटस्फोटासाठी अर्जी दिली आहे. त्यात नवरा जरा अती प्रेम करण्याचं कारण देत सांगितले आहे की त्याच्या या कृत्यामुळे ती कंटाळली आहे. तिने कोर्टाला सांगितले की माझा नवरा कधीच माझ्यावर ओरडत नाही, त्याने मला कधीच निराश होऊ दिले नाही.
 
महिलेप्रमाणे अती प्रेम आणि लाडामुळे तिला गुदमरल्यासारखं होतं. एवढेच नाही तर नवरा तिला घर कामात मदत करतो. त्यांच्या चांगल्या व्यवहारामुळे तिचं जीवन नरक झाल्याचे महिलेने सांगितले.
 
महिलेने सांगितले की काही वाद घडावा तिने यासाठी प्रयत्न देखील केले, परंतू त्याच्यासोबत भांडण अशक्य आहे. 
 
कोर्टाने अशी विचित्र तक्रार फेटाळली आहे. नवर्‍याने कोर्टाला बायकोची तक्रार परत घ्यावी असा आग्रह केला आहे. त्याने म्हटले की विवाहाच्या एका वर्षात या विषयी मत बनवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्ती चुकांमुळे शिकतो.
 
तसेच नवर्‍याप्रमाणे त्याने काहीच चुकीचे केले नाही. त्याचा उद्देश्य एक एक परिपूर्ण नवरा बनण्याचा होता. कोर्टाने नवरा-बायको आपसात मतभेद सोडविण्यास सांगितले आहे.