सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:37 IST)

सलमान खानचं व्हेलेंटाईन डे च गाण ऐकल का?

व्हेलेंटाईन डे’च्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं  पेप्सीने ‘स्वॅग से सोलो’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं खास करून सिंगल लोकांसाठी तयार करण्यात आलं आहे. तनिष्क बाग यांने हे गाणं संगीतबद्ध केलं असून रेमो डिसूझाने कोरिओग्राफी केली आहे. ‘हर घूंट में स्वॅग’ हे गाणं अशा तरुणांना समर्पित केलं आहे जे सिंगल आहेत.
 
सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे तर सहा हजारपेक्षा जास्त लोकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमानसोबत या गाण्यात रेमो डिसूजा देखील दिसत आहे.  
 
ब्रँड अॅम्बेसिडर आणि अभिनेता सलमान खान म्हणाला की, ‘स्वॅग से सोलो’ बद्दल माझी चांगली भावना आहे. कारण या अँथम साँगबद्दल माझा संबंध आहे आणि आजच्या पिढीसाठी खास आहे. आजच्या पिढीत खूप आत्मविश्वास आहे. आम्हाला हे गाणं शूट करताना खूप मज्जा आली.