मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (14:19 IST)

कोरियनचा रिमेक साकारणार शाहरुख?

शाहरुख खान बरच्या काळापासून चित्रपटसृष्टीतून गायब आहे. त्याचा 'झिरो' चित्रपट प्रदर्शित झालेल्याला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस आता कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार असलचे  समजते. शाहरुखने 'ए हार्ड डे' या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचे हक्क विकत घेतले असल्याचे समजते. शाहरुख आणि त्याच्या टीमला हा चित्रपट खूप आवडला असल्याचे सांगणत येत आहे. हा चित्रपट खरेदी करण्यासाठी शाहरुखने बरेच पैसे खर्च केल्याचीही माहिती मिळाली आहे.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार आहेत. ज्यांनी यापूर्वी 'कहानी' आणि 'बदला' यासारखे चित्रपट केले आहेत. सुजॉय सध्या अभिषेक बच्चनसोबत 'बॉब विश्वास' साकारत आहे. दरम्यान, 'ए हार्ड डे'ची कथा अशा एका माणसाची आहे ज्याच्या कारने चुकून एका व्यकतीचा मृत्यू होतो. त्या नंतर हे लपविण्यासाठी तो त्याच्या आईच्या अंत्यविधीच्या त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो.