1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (15:20 IST)

ट्रोलिंगमुळे सारा खान भावूक

Sara Khan passionate due to trolling
आतापर्यंत अवघ्या दोन चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री सारा अली खान तरुणाईमध्ये चांगलीच चर्चेत असते. तिच्या आगामी 'लव्ह आज कल' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सर्वांनाच त्यातील तिच्या भूमिकेविषयी उत्सुकता होती. मात्र, या ट्रेलरने चाहत्यांची निराशा केली. ट्रेलरमधील साराच्या एका संवादाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि त्यावर हासस्पद मीम्ससुद्धा व्हायरल झाले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच साराच्या भूमिकेची नकारात्क चर्चा होऊ लागली. सोशल मीडिावर तिला ट्रोल केले गेले. या ट्रोलिंगवर तिने नुकतच्या दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
 
'मला स्वतःवर कितीही विश्वास असला तरी त्या नकारात्मक केंट्‌सचा मनावर परिणाम होतोच. मी त्यांना दुर्लक्ष करू शकत नाही', असे ती म्हणाली.
 
याआधीही मी अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. ज्या गोष्टींचा मी कधीही विचारसुद्धा केला नव्हता, त्या गोष्टींवरून माझ्यावर टीका करण्यात आली. मी प्रेक्षकांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे स्वतःला ट्रोल होताना पाहते तेव्हा फार वाईट वाटते, अशा शब्दांत साराने तिच्या भावना व्यक्त केल्या. ट्रेलरमध्ये 'तुम मुझे तंग करने लगे हो' हा संवाद साराच्या तोंडी आहे आणि याच संवादावरून तिला ट्रोल केले गेले. प्रेक्षक जेव्हा संपूर्ण चित्रपट पाहतील तेव्हा कदाचित त्यांचे मत बदलेल, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला. इम्तिाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' हा 'लव्ह आज कल'चा सिक्वेल  आहे. सिक्वेल असला तरी चित्रपटाच्या नावात काहीच बदल करण्यात आला नाही. 2009 साली प्रदर्शित झालेल्या 'लव्ह आज कल' या चित्रपटात सैफ   अली खान आणि दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता 11 वर्षांनंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.