शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (14:40 IST)

अनुष्का शर्माची डुप्लिकेट पाहिलीत का ?

या जगात प्रत्येक व्यक्तीची हुबेहूब नक्कल असणारी दुसरी व्यक्ती जगात कुठेतरी असतेच असे म्हटले जाते. त्यातही बॉलिवूड किंवा सेलिब्रिटीजचे डुप्लिकेट असतातच. आतापर्यंत यात सलमान, ऐश्वर्या, माधुरी दीक्षित, प्रियंका चोप्रा, हृतिक रोशन यांचे डुप्लिकेट बरच जणांना माहीत आहेत. पण आता अनुष्का शर्माचीही डुप्लिकेट लोकांनी शोधून काढली आहे. 
 
ही दुसरी तिसरी कोणती तरुणी नसून अमेरिकन सिंगर 'ज्युलिया मायकल' आहे. पंचविशीची ज्युलिया आणि अनुष्कायांच्यात कमालीचे साम्य असून दोघींचे वागणे, बसणे, बोलणेही हुबेहूब आहे. यामुळे अनुष्का ज्युलियाची कॉपी करते की ज्युलिया अनुष्काची असा प्रश्र्न दोघींच्या चाहत्यांना पडला आहे. ज्युलिाचे फोटो व्हारल झाले आहेत. ब्रिटनी स्पीयर्स, सेलेना गोमेज आणि ग्वेन स्टेफनी यासारख्या नामांकित व्यकतींबरोबर ज्युलियाने काम केले आहे.