मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जानेवारी 2020 (16:02 IST)

'83' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी '83' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होत आहे. आता चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. त्यामुळे चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे. प्रदर्शित करण्यात  आलेल्या मोशन पोस्टरमध्ये संपूर्ण चित्रपटाची टीम दिसत आहे. तर चित्रपटाचे हे पोस्टर अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तो माजी क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांची व्यकतिरेखा साकारताना दिसणार आहे. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपवर '83' चित्रपट आधारित आहे. चित्रपटात दीपिका, कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. येत्या   10 एप्रिल रोजी '83' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंह, ताहिर राज भसीन आणि जीवा व्यतिरिक्त '83' चित्रपटात चिराग पाटील, हार्डी संधू, साहिल खट्टर, साकिब सलीम, दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी आणि इतरही कलाकार भूमिका साकारणार आहेत.'