गली बॉयनंतर आता '83' या चित्रपटासाठी गाणं गाऊ शकतो रणवीर सिंग
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून अनेक खिताब देखील आपल्या नावावर केले आहेत. रणवीरने अलीकडेच आपल्या चित्रपट 'गली बॉय' मध्ये 'अपना टाइम आएगा' हे गाणं म्हटलं होत. त्याची सिगिंग स्कील बघून सर्व त्यांच्या आवाजाचे फॅन झाले आहेत.
असे ऐकण्यात येत आहे की रणवीर सिंग पुन्हा एकदा त्याच्या आगामी स्पोर्ट ड्रामा '83' साठी गाऊ शकतो. '83' या चित्रपटात संगीत देणार्या प्रीतमने नुकतेच चित्रपट निर्मात्यांसह रणवीरच्या गाण्याविषयी बोलणी केली आहे. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी देखील यावर सहमती दिली आहे. अहवालांनुसार रणवीर लवकरच चित्रपटाचं गाणं गाऊ शकतात.
कबीर सिंग दिग्दर्शित हे चित्रपट 1983 क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. यात भारताने एक मोठा विजय मिळविला होता. रणवीर सिंग या स्पोर्ट ड्रामा चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कपिल देवची भूमिका बजावत आहे. रणवीर व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, हार्डी संधू, एमी विर्क, जिवा, साकिब सलेम, ताहिर राज भसीन, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील आणि इतरही कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की दीपिका पदुकोण देखील या चित्रपटात दिसेल.