1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Updated: सोमवार, 20 मे 2019 (12:57 IST)

#ICCWorldCup2019 : चौथ्या स्थानी लोकेश राहुल योग्य पर्याय – गौतम गंभीर

विश्‍वचषक स्पर्धा 15 दिवसांवर आली असली तरी मधल्याफळीतील फलंदाजांचा क्रम अद्यापही ठरलेला नसुन चौथ्या स्थानी कोण उतरेल यावरुन चर्चा सुरू असुन भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या मते चौथ्या स्थानी लोकेश राहुलला खेळवल्यास त्याचा फायदा संघाला होईल आणि सध्या तोच उत्तम पर्याय भारतीय संघासमोर असणार आहे.
 
एका कार्यक्रमात गौतम गंभीरला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीविषयी प्रश्न विचारला. यावर बोलताना तो म्हणाला की, चौथ्या क्रमांकाच्या जागेवरुन प्रदीर्घ काळासाठी भारतीय संघ व्यवस्थापन रायुडूला संधी देत राहिली, आणि अचानक त्याला विश्‍वचषक संघात त्याला स्थान नाकारण्यात आले. आता भारताकडे लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांचा पर्याय आहे. या तिघांपैकी एक फलंदाज चौथ्या जागेवर फलंदाजी करेल. इंग्लंडमधील खेळपट्टीवर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जागा महत्वाची ठरणार आहे. संघाची खराब सुरुवात झाल्यास डाव सांभाळण्याची जबाबदारी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची आहे. यासाठी चौथ्या क्रमांकावर माझ्यामते लोकेश राहुल योग्य उमेदवार आहे.