सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (10:50 IST)

मिताली राजच्या बायोपिकचा फर्स्‍ट लूक रिलीज

भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजच्या बायोपिकचा फर्स्‍ट लूक रिलीज झाला आहे. मिताली राजचा बायोपिक 'शाबाश मिट्ठू'मध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. ती मितालीची व्यक्तीरेखा साकारतेय. 
 
तापसी हूबेहूब मिताली राजप्रमाणे दिसत आहे. बायोपिकच्या पहिल्या पोस्टरमध्ये तापसी क्रिकेटची निळी जर्सी घातलेली दिसत आहे. हॅट आणि हातात बॅट पकडलेली दिसते. पोस्टरमध्ये तापसी जोशपूर्ण दिसत असून ट्विटरवर #Mitaliraj हा हॅशटॅग सुरू आहे. 
 
या बायोपिकशिवाय तापसी पन्नू ॲथलीट रश्मीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे नाव रश्मी रॉकेट आहे आणि चित्रपटाचे मोशन पोस्टरदेखील रिलीज झाले आहे.