1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:27 IST)

अक्षयने दिला आमिरच्या विनंतीला मान

akshay-kumar-moves-bachchan-pandey-release-date-for-laal-singh-chaddha
अनेकदा एकाच आठवड्यात दोन-तीन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होते. याचा फटका अर्थात कलाकारांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांना बसतो. हे टाळण्यासाठी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. यासाठी आमिरने अक्षय कुमारला विनंती केली होती.
 
जुलै २०१९ मध्ये अक्षयने ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला होता. त्यावेळी हा चित्रपट २०२० च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले होते. तर २५ डिसेंबर २०२० रोजी आमिरचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांनी ‘बच्चन पांडे’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.