मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'बागी ३ मध्ये टायगर श्रॉफ आणि जॉकी श्रॉफ सोबत दिसणार

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आगामी 'बागी ३'या अभिनेता जॉकी श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी घोषणा केली आहे. 
 
निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी सांगितले आहे की, अहमद खान 'बागी ३' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट 'बागी' या अ‍ॅक्शन ड्रामाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात जॉकी श्रॉफ टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात जॉकीचा एक कॅमिओ रोल असून तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत आहेत.