मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2020 (12:14 IST)

टिक टॉकवर व्हिडिओ केल्यामुळे दीपिका ट्रोल

अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित 'छपाक' हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली आहे. 'छपाक'मधील दीपिकाचा अभिनय पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं. मात्र आता तेच चाहते तिच्यावर नाराज असलचं पाहायला मिळत आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या छपाकचं प्रमोशन करणारा टिक टॉक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. परंतु ज्यापद्धतीने तो व्हिडिओ शूट केला आहे त्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'छपाक'चं प्रमोशन करण्यासाठी दीपिका आणि टिक टॉक स्टार म्हणून ओळखल्या जाणार्‍या फाबीने एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये दीपिकाने फाबीला तिच्या आवडीच्या तीन चित्रपटांमधील लूक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं. यामध्ये 'ओम शांती ओम', 'पीकू' आणि 'छपाक' या चित्रपटांमध्ये दीपिकाने जो लूक केला होता तो फाबीला रिक्रिएट करायचा होता. 
 
मात्र हे चॅलेंज नेटकरंना फारसं पटलं नाही. यात छपाकमधील लूक रिक्रिएट करण्यास सांगितल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिला ट्रोल केलं आहे. दीपिकाने केलेला 'हा व्हिडिओ अत्यंत लाजिरवाणा आहे', असं काहींनी म्हटलं आहे. तर 'निदान दीपिकाने तरी असं करायलं नको होतं', असं काहींचं मत आहे. इतकंच नाही तर 'हा सारा पब्लिकस्टंट असून अत्यंत वाईट आहे', असं म्हटलं आहे. 'एखाद्या अ‍ॅसिड हल्ला झालेल्या व्यक्तिविषयी टिक टॉक चॅलेंज देणं चुकीचं आहे. तुला लाज वाटली पाहिजे', अशा शब्दांत नेटकर्‍यांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.