गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (16:58 IST)

राजकुमार राव टाळतो नकारात्मक भूमिका

वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाणारा राजकुमार राव सध्या विचार करून भूमिका निवडत आहे. याचे कारण 'स्त्री' चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यामुळे त्यांने राजकुार संतोषी यांनी ऑफर केलेल 'गांधी वर्सेस गोडसे'मध्ये काम करण्यास नकार दिला आहे. खरं तर संतोषी यांनी राजकुमारला नथुराम गोडसेंची भूमिका ऑफर केली होती. मात्र राजकुमार करिअरच्या या स्टेजवर नकारात्मक भूमिका करू इच्छित नाही. राजकुमारने नुकतेच 'जजमेंटल है क्या'मध्ये सायको किलरची भूमिका केली होती. ती त्याच्या चाहतंना आवडली नाही. त्यामुळे राजकुारने संतोषी यांना नकार दिला असावा. दुसरे कारण असे की, गोडसेंविषयी राजकुमारने आपले मत अजून व्यक्त केले नाही.
 
राजकीयदृष्ट्या गोडसेंना उजव्या विचारसरणीने नेहमी नायक आणि डाव्या विचारसरणीने खलनायक म्हटले आहे. दुसरीकडे राजकुमारने कधीच आपली राजकीय विचारसरणी सांगितली नाही. या चित्रपटासाठी संतोषी यांना गांधीच्या भूमिकेसाठी कलाकारदेखील मिळाले नाहीत. याच्या मागचे कारण अजून कळाले नाही. यासाठी नसीरुद्दीन शाह यांना विचारणा करण्यात आली आहे. नसीर यच्याकडून अजून फायनल कॉल आला नाही. त्यांच्या जवळच्या मित्रानुसार, नसीरला ही भूकिा करायला आवडेल. ते संतोषीच या चित्रपटात काम करण्यासाठी होकार देऊ शकतात.