रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

उत्सुकता वाढवणारा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चा ट्रेलर रिलीज

अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आयुषमानने या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. “शुभ मंगल सावधान या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता आम्ही ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट घेऊन तुमच्या भेटीस येत आहोत. आम्ही यावेळी खूप मेहनत केली आहे. तुम्ही देखील थोडे अधिक प्रेम द्या.” अशा आशयाचे ट्विट आयुषमानने केले आहे.
 
या चित्रपटात आयुषमानबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय देखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य याने केले आहे. येत्या २१ फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.