मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (10:14 IST)

'वीरे दी वेडिंग-2'ला करिना कपूरकडून दुजोरा

बॉक्स ऑफिसवर 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच येणार आहे. यासंदर्भात आता खुद्द करिना कपूरने दुजोरा दिला आहे. करिनाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'वीरे दी वेडिंग 2' चित्रपट साकारणार असल्याचे सांगितले आहे. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन अवस्थेत आहे. करिना कपूर म्हणाली, मी दुसर्‍या भागात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पहिल्या भागातील शूटिंगदरम्यान मला खूप मजा आली होती आणि मला पुन्हा हा अनुभव घ्यायला आवडेल, असे तिने सांगितले. 
 
दरम्यान, 'वीरे दी वेडिंग-2' साकारणार असल्याची यापूर्वीही चर्चा रंगलीहोती. तसेच सोनम कपूर आणि स्वरा भास्करच कास्टिंग झाल्याचे कन्फर्म मानले जात आहे. त्यावेळी करिनाने याबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते, पण आता असे दिसते की प्रेक्षक पहिल्या चित्रपटातील प्रमुख नायिका पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहू शकतील.