सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2020 (15:23 IST)

आलिया भट्ट बनली भन्साळीची 'गंगूबाई काठियावाडी', बघा या माफियाची क्‍वीनचा First Look

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी गेल्या तीन चित्रपटांत दीपिका पादुकोणचे वेगवेगळे अवतार दाखवले आहेत. पण आता दीपिका वगळता भन्साळीची नवी राणी अभिनेत्री आलिया भट्ट बनली आहे. आलिया भट्टसमवेत भन्साळीच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi)चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे.'''!' 
 
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट मुंबईच्या माफिया क्वीन गंगबाई काठियावाडीवर आधारित आहे, जी पूर्वी सेक्स वर्कर होती आणि नंतर अंडरवर्ल्ड डॉन बनली होती. हा चित्रपट लेखक हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'  (Mafia Queens Of Mumbai)या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाच्या या पहिल्या पोस्टरमध्ये आलियाचा लूक खूपच दमदार दिसत आहे. आलिया भट्टने स्वतः तिच्या चित्रपटाचा हा लूक शेअर केला आहे. 'सामर्थ्य, ताकद, भीती' असे लिहून आलियाने हे शेअर केले. एक लुक, हजार भावना .. इथे 'गंगूबाई काठियावाडी' चा फर्स्ट लूक आहे.