मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 16 जानेवारी 2020 (15:34 IST)

'तान्हाजी' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु

अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाने तीन दिवसात 60 कोटींचा आकडा पार केला आहे. ट्रेड विश्लेषक तरन आदर्श यांनी तीनही दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. सिनेमाने तीन दिवसात मिळून तब्बल 61.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 
 
तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.57 कोटी आणि रविवारी 26.08 कोटी असे पहिल्या विकेंडला 61.75 कोटी रुपयांची कमाई केली.  ‘तान्हाजी’ हा सिनेमा मराठमोळा दिग्दर्शित ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगणच्या करियरमधील हा शंभरावा सिनेमा आहे.