रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (11:59 IST)

आलियाही चालली हॉलिवूडमध्ये

आलिया भटचा यापूर्वीचा सिनेमा 'कलंक' बॉक्स ऑफिसवर फार प्रभाव पाडू शकला नाही. मात्र त्यामुळे आलियाचे काहीही नुकसान झाले नाही. तिच्याकडे  सध्या बॉलिवूडचे अनेक प्रोजेक्ट आहेत. पण तीदेखील दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्राच्या पावलावर पाऊल टाकून आता हॉलिवूडमध्ये जाण्याची तयारी करायला लागली आहे. तिच्या अनुभवाच्या मानाने तिला हॉलिवूडमध्ये फारच लवकर ब्रेक मिळतो आहे, असे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे. निरीक्षण नोंदवायचे तर आलियाला काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये रेस्टॉरंटमध्ये पार्टी करताना बघितले गेले होते. हॉलिवूडच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांबरोबर काम करण्यासाठी आलिया सध्या एका इंटरनॅशनल सेलिब्रिटी एजंटच शोधात आहे. 
 
ती सध्या एका इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या ऑडिशनची तयारी करते आहे, असेही समजले आहे. तिथल्या कास्टिंगबाबतचे अपडेट मिळवण्यासाठीही तिला या सेलिब्रिटी एजंटची मदत हवी आहे. आलियाच्या अगोदर दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, हुमा कुरेशी, ऐश्वर्या राय बच्चन आणि अली फजल या मंडळींनी हॉलिवूडमध्ये आपला जम बसवला आहे. आलियाला कोणता प्रोजेक्ट मिळतो आहे आणि त्यामध्ये ती स्वतःची गुणवत्ता कशी सिद्ध करते हे थोड्या दिवसातच आपल्याला समजेल.