मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (13:45 IST)

लोक माझी खिल्ली का उडवत नाहीत?

प्रियाचा अजब सवाल
मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे नाव आज कोणासाठीही नवं नाही. 2018 या वर्षाच्या सुरुवातीला एका व्हारल व्हिडिओच्या माध्यमातून प्रिया 'ब्लिंकिंग गर्ल' म्हणून सर्वांसमोर आली. पाहता पाहता सोशल मीडियावर 'ओरु अदार लव्ह' या चित्रपटातील 'माणिक्य लरा पूवी' या गाण्याचा एक लहानसा व्हिडिओ असा काही प्रसिद्धी झोतात आला की, खर्‍या अर्थाने प्रियाने रातोरात नशीब बदलण्याचाच अनुभव घेतला. या गाणचा काही भाग प्रदर्शित होताच प्रियाने त्याची लिंक मिळ त ती आपल्या मित्रांमध्ये शेअर केली आणि नेहमीप्रमाणे झोपी गेली. दुसर्‍या दिवशी जे काही झालं ते मात्र प्रियासाठी अनपेक्षित होतं. 
 
सोशल मीडियावर अकाऊंट स्वतःपुरता सीमित असताना आपण, त्यावर काहीही पोस्ट करत असल्याचं तिने सांगितलं. प्रिया म्हणाली, 'माझी अनेकदा खिल्ली उडवली गेली आहे. पण, कित्येकदा माझ्यावरील विनोद, मीम्स वगैरे पाहून मलाही ते भावल्यास मीसुद्धा ते शेअर करते. अर्थात त्यातील काहींमुळे आम्ही दुखावलेही जातो. मी दुखावली जाते. पण, तरीही ठीक आहे. मला आता या सार्‍याची सवय झाली आहे. अनेकदा तर माझी खिल्ली उडवली गेली नाही, तर लोक माझी खिल्ली का उडवत नाहीत, असा प्रश्र्नही मला पडतो', असं प्रिया म्हणाली.