सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (13:22 IST)

सारा अली खानने केली स्वतःचीच थट्टा, लोकांनी केलं कौतुक

बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खानने बुधवारी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. यामध्ये ती तिची आई अमृता सिंग यांच्यासोबत आहे.
 
हा फोटो पाहिल्यानंतर ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आणि बॉलिवुडमधली अभिनेत्री सारा अली खान आहे यावर विश्वास बसणं कठीण आहे.
 
कारण या फोटोत दिसणारी सारा, आत्ताच्या सारापेक्षा अगदी वेगळी आहे.
इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत सारा अली खानने लिहिलं, "थ्रो बॅक...टू व्हेन आय कुडण्ट बी थ्रोन."
 
इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टला आतापर्यंत २० लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय आणि त्यावर २० हजारांपेक्षा जास्त कॉमेंट्स पडलेल्या आहेत.
 
सगळ्यांत आधी कॉमेंट केली ती बॉलिवुड अभिनेता कार्तिन आर्यनने.
 
कार्तिकने लिहिलं, "ही मुलगी सारा अलीसारखी दिसतेय."
कार्तिकसोबतच इतर बॉलिवुड कलाकारांनीही साराच्या या फोटोवर कॉमेंट केली आहे.
 
श्रद्धा कपूरने लिहिलंय, "किती मस्त प्रवास आहे हा तुझा...सलाम तुला."
 
साराच्या या बदलासाठीच्या प्रवासाबद्दल आयुषमान खुराणानेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
एकीकडे बहुतेक लोकांनी साराला स्थूलपणा कमी करत फिट झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही लोक तिला तिच्या डाएटबद्दल विचारतायत.
तिने इतकं वजन कसं कमी केलं, ती कोणतं डाएट पाळते आणि इतकी फिट कशी राहते याबद्दल अनेकणांनी विचारणा केली आहे.
 
सारा अली खानने तिचा पहिला सोलो इंटरव्ह्यू बीबीसी एशियन नेटवर्कला दिला होता. बीबीसीचे प्रतिनिधी हारुन रशीद यांनी तिच्याशी तिचं आयुष्य, आई-वडिलांमधले संबंध आणि सिनेसृष्टीत पदार्पणाच्या निर्णयाबद्दल गप्पा मारल्या होत्या.
 
या इंटरव्ह्यूमध्ये सारा तिच्या वजनाबद्दलही बोलली होती.
 
आज मागे वळून पाहिल्यानंतर आपण इतके बदललो यावर विश्वास ठेवणं अनेकदा कठीण जात असल्याचं, बॉलिवुडमधल्या दोन सुपरस्टार्सची मुलगी असणाऱ्या सारा अली खानने बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
 
सारा म्हणते, "अनेकदा जेव्हा मी स्वतःलाच पाहते, तेव्हा मला मी आकर्षक वाटते."
 
पण ती लहान असताना शाळा - कॉलेज आणि प्रत्येक ठिकाणीच लोक तिला जाडी म्हणत.
 
वजन घटवण्याबद्दल ती म्हणते, "मुंबईला आल्यानंतर वजन कमी करण्याचा विचार मी केला नव्हता. चार वर्षं मी कोलंबियामध्ये होते. आणि आपण ऍक्टिंगमध्येच करियर करायचं हे दुसरं वर्ष संपेपर्यंत मी नक्की केलं होतं. त्याआधी माझा वकील होण्याचा किंवा पॉलिटिक्समध्ये करिअर करण्याचा विचार होता. तेव्हा माझं वजन ९६ किलो होतं."
वजन कमी करण्यासाठी सगळ्यांत आधी आहारावर नियंत्रण आणून डाएटकडे लक्षं द्यायला सुरुवात केली आणि सोबतच वर्कआऊटही केल्याचं सारा सांगते.
 
केदारनाथ फिल्मद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराचे दोन सिनेमे रिलीज झाले असून दोन्ही हिट झाले आहेत. तिच्या येऊ घातलेल्या फिल्म्सपैकी एक 'कुली नंबर वन' असून यामध्ये ती वरुण धवन तिच्यासोबत आहे.