मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (13:54 IST)

सलमानने फोन करुन मागितली मदत, केआरकेने दिले वचन

सलमान खानचा ‘दबंग 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता बघायला मिळाली परंतू अभिनेता कमाल राशिद खानने ट्विटरद्वारे ‘दबंग ३’चा ट्रेलर सुपर फ्लॉप असे म्हटले होते. 
 
आता केआरकेचे म्हणणे आहे की त्याच्या या ट्विटमुळे सलमानने त्याला फोन करुन मदत मागितली आहे. केआरकेने काल एक ट्विट केले आहे की रात्री त्याला सलमान खानने स्वत: फोन करुन दबंग ३ चित्रपटाला पाठिंबा देण्यास सांगितले आणि मी सुद्धा त्याला वचन दिले आहे की मी यापुढे चित्रपटा संबंधीत कोणतेही ट्विट करणार नाही.
 
या आधी केआरकेने चित्रपटासंबंधीत भविष्यवाणी करत म्हटले होते की ‘दबंग 3’चा ट्रेलर सुपर फ्लॉप आहे, गाणीदेखील फ्लॉप आहेत. केवळ रिक्षाचालक चित्रपट पाहण्यासाठी जातील. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त 150 कोटींची कमाई करु शकतो.