सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (11:26 IST)

सलमान खान जोधपूर न्यायालयात हजर होणार?

काळविटांच्या कथित शिकारीप्रकरणाच्या सुनावणीसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान शुक्रवारी जोधपूर न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. दरम्यान सलमानला गॅरी शूटरकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे.
 
काळवीटाच्या शिकारीप्रकरणी दोषी ठरवल्याने सलमानने याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा ठोठावली होती.
 
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चंद्र कुमार सोंगारा यांनी चार जुलैला सुनावणीदरम्यान 27 सप्टेंबरला सलमानला हजर राहण्याचे आदेश दिले होते. हजर न राहिल्यास सलमानचा जामीनही रद्द होऊ शकतो.
 
मात्र तरीही सलमान न्यायालयासमोर हजर न होण्याचीच चिन्हं आहेत. सलमानच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केल्याचं पोलीस आणि प्रशासनाचं म्हणणं आहे.