गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानची नवी घोषणा, 'नच बलिये'च्या जोडी विजयी 'ही' लॉट्री

salman khan
'नच बलिये'च्या कलाकारांसाठी एका लॉट्रीची घोषणा केली आहे. यात 'नच बलिये'च्या यंदाच्या पर्वात जी जोडी विजयी ठरेल, त्या जोडीला सलमान स्टारर 'दबंग ३' चित्रपटातील एका गाण्यामध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. 'नच बलियेच्या' या पर्वाला सलमान खान निर्मीत करत आहे. 
 
कपल शोची विजेती जोडी ठरेल तिला सलमानच्या चित्रपटात काम करता येणार आहे. 'दबंग ३' चित्रपट यंदाच्या वर्षाखेरीस प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे गाण्याचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे. आता कोणता सेलेब कपल सलमानसोबत थिरकण्यास पात्र असेल हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.