शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

फॅट टू फिट झाले राम कपूर, या खास रूटीनने कमी केलं 30 किलो वजन

Ram kapoor reduced weight
बडे अच्छे लगते है स्टार राम कपूर अलीकडे कोणत्याही मालिकेमुळे नाही तर आपल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. राम कपूरने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात त्यांना ओळखणे कठिण होतंय. त्यांच्यात गजबचा ट्रांसफॉर्मेशन बघायला मिळत आहे.


 
राम कपूरने सोशल मीडियावर फोटो शेअर केला ज्यात त्याचं वाढलेलं वजन आणि नंतर फिट बॉडी दिसतेय. राम कपूरने आपलं वजन खूप कमी केलं आहे. फोटोत ते स्लिम आणि फिट दिसत आहे.


 
खूप काळापासून टीव्हीहून लांब राम कपूरचा हा मेकओव्हर लोकांना खूप आवडतोय. सुमारे 2 वर्षांपूर्वी राम कपूरने वयाच्या 45 व्या वर्षात पडण्यापूर्वी स्वत:ला फिट होण्याचे निश्चित केले होते. आपल्या फिटनेसवर ते वर्ष 2017 पासून काम करत होते. आपल्या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं की 'कसे आहात सगळे, खूप दिवसांपासून आपल्या सगळ्यांना बघितलं नाही.'


 
कधी 130 किलो वजनी राहून चुकले राम कपूर 30 किलो वजन कमी करून चुकले आहे आणि 25 ते 30 किलो वेट अजून कमी करू इच्छित आहे. राम कपूरने सांगितले की ते सकाळी उठून काही न खाता सरळ जिम करतात आणि तेथे खूप वेळेपर्यंत वर्कआउट करतात. रामने हे देखील सांगितले की ते दिवसभर आपलं कॅलरी काउंट करत असतात. आणि दररोज 16 तास उपास देखील ठेवतात.


 
राम कपूर टीव्ही आणि बॉलीवूडचे यशस्वी कलाकार आहे. राम कपूरने कलाकार गौतमी गाडगिल हिच्यासोबत विवाह केला आहे. दोघांची भेट का टीव्ही शो घर एक मंदिर दरम्यान झाली होती. राम आणि गौतमी यांचे दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचं नाव अक्स कपूर आणि मुलीचं नाव सिया कपूर आहे.
 
राम कपूर केवळ मालिकेत नाही तर अनेक चित्रपटांचा भाग राहून चुकले आहेत. राम शेवटी आयुष शर्मा अभिनित सिनेमा 'लव यात्री' यात दिसले होते.