मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

खेळणं गिळल्याने प्रसिद्ध अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा खेळणं गिळ्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूची माहिती प्रतीश यांनी स्वत: सोशल मीडियावर दिली. तिच्यावर अंत्यंतसंस्कार राजकोटमध्ये करण्यात आले. या बातमीमुळे पूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. 
 
मुलगी ८ मे रोजी रात्री घरी प्लास्टिकच्या खेळण्यांसोबत खेळत होती. यावेळी खेळता-खेळता मुलीने खेळणं आपल्या तोंडात घेऊन चुकीने गिळलं. मुलीच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, पण यश आलं नाही. खेळणं घशात अडकल्याने मुलीला श्वास घेताना त्रास होत होता. अखेर गुदमरल्याने मुलीचा मृत्यू झाला.