रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (09:56 IST)

आयपीएल सट्टेबाजी : बापाने तीन मुलींना विष पाजून केली आत्महत्या

उत्तर प्रदेशातील वाराणसीत आयपीएलमधील सट्टेबाजीत सर्व पैसे हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका व्यक्तीने आपल्या तीन मुलींना विष पाजून स्वत: आत्महत्या केली. दीपक कुमार गुप्ता असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, निबिया (9), अद्वितीय (7) आणि रिया (5) अशी मुलींची नावे आहेत.
 
दीपक लक्सा येथे कपडे विकण्याचे काम करत होता. कुटुंबामध्ये दीपकच्या पाश्चात पत्नी आणि तीन मुली निबिया, अद्वितीय आणि रिया होत्या. आयपीएल सामन्यादरम्यान दीपक सलग सट्टेबाजीमध्ये पैसे हरत होता. सट्टेबाजीत हरल्यानंतर दीपक कर्जबाजारी झाला होता. घटनेच्या एकदिवस आधी दीपकची पत्नी माहेरी गेली होती. ही घटना घडल्यानंतर शेजारील लोकांनी तातडीने या चौघांसह रुग्णालयात धाव घेतली. मात्र उपचारादरम्यान या चौघांचा मृत्यू झाला.