मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (11:04 IST)

काश्मीरमध्ये ISIS दहशत संपली, ISJKच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन वर्षांपासून सक्रिय इस्लामिक स्टेटचा दहशतवादी कमांडर अब्दुल्लाचा शोपियाँ येथे खात्मा करण्यात सुरक्षा दलांच्या जवानांना यश आलं आहे. अधिकार्‍यांचा दावा आहे की हा काश्मीरमध्ये आयएसआयएसचा शेवटला कमांडर होता.
 
शोपियाँ जिल्ह्यातील गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलानं आज पहाटे परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.
 
अधिकार्‍यांप्रमाणे, 2015 मध्ये हरकतुल मुजाहिदीनमध्ये सामील झाल्यानंतर अब्दुल्लाने 2016 मध्ये इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीर याशी जुळला होता आणि त्याला जम्मू काश्मीर मध्ये इस्लामिक स्टेट कमांडर बनवले गेले होते.