1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (17:48 IST)

पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट, दहशतवादी हल्‍ल्‍याची मोठी शक्‍यता

देशात दुसरा दहशतवादी हल्‍ल्‍याची मोठी शक्‍यता गुप्तचर यंत्रणेकडून वर्तवण्‍यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम रेल्‍वेच्‍या सर्व स्‍थानकावर सुरक्षेच्‍या दृष्‍टीने सुरक्षा यंत्रणा वाढवण्‍यात आली आहे. महाराष्‍ट्र, गुजरात व मध्‍य प्रदेश या तीन राज्‍यांना हा इशारा देण्‍यात आला आहे. पश्चिम स्थानकांवरील सर्व सुरक्षा यंत्रणांना लांब पल्ल्यांच्या गाड्यावर करडी नजर ठेवण्याचा आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने आदेश दिला आहे. 
 
चर्चगेटमधील महानिरीक्षक कार्यालयाने २२ फेब्रुवारीला मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील आरपीएफ प्रमुखांना पत्र पाठवले आहे. पत्रात सांगण्यात आले आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे. गुजरातमधील गुप्तचर यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले जातील अशी माहिती दिली आहे.