वाढता तणाव निवळण्यासाठी अमेरिका पुढाकार घेणार : ट्रम्प
पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान उघडा पडला आहे. रशिया, अमेरिकेसारख्या देशांनीही भारताला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढता तणाव निवळण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेलं तणावाचं वातावरण लवकरच संपुष्टात आलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
मला आशा आहे की दोन्ही देशांमधील तणाव लवकरच निवळेल, अनेक वर्षांपासूनचा असलेला हा वाद लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.