1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ठरलं, शाहरुख आणि सलमान एकत्र येणार

It is decided that Shah Rukh and Salman will be together
तब्बल २५ वर्षांनतर शाहरुख आणि सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मिळाले. 
 
जुहूच्या सोहो हाऊसमध्ये चित्रपटाची स्क्रीप्ट आणि संपूर्ण टीम ठरवण्यात आल्याचं समजत आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही खान चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहेत. याआधी संजय लीला भन्साळींनी 'देवदास' चित्रपटात शाहरुख खान सोबत तर 'हम दिल दे चुके सनम'सारख्या सुपरहिट चित्रपटात सलमान खान सोबत काम केलं आहे.
 
आता तब्बल २५ वर्षांनंतर सलमान-शाहरुख एकत्र येत आहेत आणि त्यांना संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन लाभणार आहेत. हे त्रिकूट लवकरच चित्रपटाच्या चित्रिकरणाचा नारळ फोडणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.