बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (10:49 IST)

धमाकेदार 'जवानी जानेमन' चा ट्रेलर प्रदर्शित

सैफ अली खान, तब्बू आणि आलिया फर्निचरवाला स्टारर 'जवानी जानेमन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नितिन कक्कड दिग्दर्शित 'जवानी जानेमन'मध्ये सैफचा फ्लर्टी अंदाज पाहायला मिळतोय. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. तर जॅकी भगनानीने चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या ३१ जानेवारी २०२०ला 'जवानी जानेमन' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
 
आलिया फर्निचरवाला पूजा बेदी यांची मुलगी असून 'जवानी जानेमन'मधून आलियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. ट्रेलरमध्ये सैफची भूमिका पार्टी करणारा, फ्लर्ट करणारा अशी दाखवण्यात आली आहे. तब्बूने आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे.