बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'दरबार' साठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह

सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'दरबार' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या चित्रपटासाठी साऊथमधील एका कंपनीने तर, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पेड लीव्ह आणि 'दरबार' चित्रपटाची फ्री तिकिट्स ऑफर केली आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट एन्जॉय करावा, यासाठी कंपनीकडून अशाप्रकारे भरपगारी सुट्टी आणि फ्री तिकिट्स देण्यात आली आहेत. 
 
'दरबार'मध्ये रजनीकांत एका पोलिसाची भूमिका साकारणार आहेत. अनेक वर्षांनंतर ते पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. नयनतारा डॉक्टरच्या भूमिकेत आहे. या कॉप ड्रामामध्ये सुनिल शेट्टी खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. ए आर मुरुगादास 'दरबार' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. येत्या ९ जानेवारी २०२० ला 'दरबार' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.