सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (10:44 IST)

दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये पोहचली

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन मंगळवारी रात्री विद्यापीठात पोहचली. परंतू यावेळी दीपिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
 
तेथे असताना दीपिका पूर्णवेळ केवळ शांत उभी होती आणि नंतर काहीहीन बोलता तेथून निघून गेली. दीपिकाने यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिची भेट घेत विचारपूस केली. 
 
दीपिका आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. या दरम्यान तिने विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने कोणतंही भाषण केलं नाही. दरम्यान कन्हैय्या कुमारने आजादीच्या घोषणा देण्यास सुरुवात करताच दीपिका उठून उभी राहिली आणि काहीही भाषण न करता तेथून निघून गेली.
 
दीपिका जेएनयूमध्ये पोहोचल्याची बातमी कळताच सोशल मीडियावर तिच्याविरोधात ट्रेंड सुरु झाला. काही लोकांनी तिचे समर्थन केले तर काहींनी तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’चा बहिष्कार करण्याची भाषा केली.